या तारखेला रिलीज होणार ब्रह्मास्त्र


लवकरच मोठ्या पडद्यावर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे रिअल लाईफ कपल प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहे. ही जोडी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. पण या चित्रपटाची रिलीज तारीख बरीच कामे अजून बाकी असल्याने पुढे ढकलण्यात आली आहे.

याबद्दलची माहिती अयान मुखर्जींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. २०१९ ला नाताळाच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आता २०२० च्या उन्हाळ्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर अद्याप प्रदर्शनाची नेमकी तारीख घोषित करण्यात आली नसून लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होईल, असेही अयानने म्हटले आहे. आलिया आणि रणबीरशिवाय चित्रपटात अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून ही कथा लिहिण्यासाठी त्यांना तब्बल ५ वर्षे लागले होते.

दरम्यान ‘ब्रह्मास्त्र’ यावर्षी नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला असता तर सलमान खानच्या ‘दबंग ३’ आणि अक्षय कुमारच्या ‘गुड न्यूज’ या दोन चित्रपटांशी त्याची टक्कर अटळ होती.

Leave a Comment