राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी फोगाट आणि बजरंगची शिफारस


नवी दिल्ली: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांची शिफारस करण्यात आली आहे. सरकारकडे ही शिफारस भारतीय कुस्ती संघाने केंद्राने केली आहे.

आशियाई कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजनी गटातील कांस्यपदक विनेश फोगाट हिने शुक्रवारीच जिंकले होते. तर आंतरराष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत ८ सुवर्णपदके बजरंग पुनियाने जिंकली आहेत. कॉमनवेल्थ आणि आशियाई गेम्समध्येही त्याने सुवर्णपदक जिंकली आहेत. त्यामुळे या दोघांच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राहुल आवारे, हरप्रीत सिंह, दिव्या ककरन आणि पूजा ढांडा यांच्या नावाची कुस्ती संघाने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी विरेंदर कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमार यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

येत्या सप्टेंबरमध्ये आशियाई खेळाडूंच्या कामगिरीची केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड हे समीक्षा करणार आहेत. त्यानंतर निवड समितीला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी क्रीडा मंत्रालयाकडून शिफारस केली जाईल. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी क्रीडा पुरस्कार दिले जातात. मात्र यावर्षी २५ सप्टेंबर रोजीच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याच काळात आशियाई स्पर्धा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment