अॅरॉन फिंचला विराट-धोनीचे अनोखे गिफ्ट


सिडनी – सध्या भारतात सुरु असलेला आयपीएल मुख्य झोतात आला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीला जगातील इतर देशातील संघ लागले आहे. या दरम्यान, विराट आणि धोनीने दिलेल्या गिफ्टचा फोटो ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अॅरोन फिंच याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सारेच जण तो फोटो पाहून फिंचचे कौतुक करत आहेत.


जेव्हा भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ आला होता विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांनी तेव्हा अॅरोन फिंचला त्यांची स्वत:ची जर्सी दिली होती. त्या जर्सीचा फोटो फिंचने शेअर केला आहे. फोटोला कॅप्शन देत फिंचने लिहिले की, मी विराट आणि धोनीचा आभारी आहे. तुम्ही मला भारत दौऱ्यात जर्सी दिली. तुमच्या विषयी आमच्या मनात प्रेम आणि आदर आहे. भारतात मालिका जिंकण्यासाठी आम्ही पूरेपूर प्रयत्न केला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मागील महिन्यात झालेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनविले आहे. स्मिथच्या जागी फिंचला कर्णधार बनविल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तो यंदाच्या विश्वचषकात कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment