२७ डिसेंबरला ‘गुड न्यूज’ देणार अक्षय-करिना


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला राज मेहता यांचे दिग्दर्शन असलेला ‘गुड न्यूज’ चित्रपट येणार होता. येत्या सप्टेंबर महिन्यात अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजित दोसांज आणि कियारा अ़डवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अक्षय कुमार यांनी केली आहे.

दरम्यान याआधीही तशन, बेवफा, ऐतराज, कमबख्त ईश्क आणि अजनबी सारख्या चित्रपटांत अक्षय आणि करिनाने एकत्र काम केले आहे. तर याआधी उडता पंजाब चित्रपटात दिलजित आणि करिनाने स्क्रीन शेअर केली आहे. आता त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment