नागार्जुनच्या मुलाशी विवाह केल्यानंतर ‘ही’ अभिनेत्री झाली 356 कोटींची मालकीण


नशिब हे असे आहे जे कोणाचे उजळले याचा काही नेम नाही. पण असेच काहीसे दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री समांथा अक्किनेनी हिच्यासोबत घडले आहे. समांथा 2017साली नागार्जुनचा मुलगा चैतन्यसह विवाहबंधनात अडकली. एका चित्रपटाच्या माध्यमातून समांथा आणि चैतन्यची ओळख झाली. त्यानंतर प्रेमात त्यांच्या मैत्रीचे रूपांतर झाले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर समांथाकडे आता एकूण 356 कोटींची संपत्ती आहे.

2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ चित्रपटाच्या माध्यमातून समांथाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ती घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पार्ट टाईम नोकरी करत होती. तिचे कुटुंब तिच्या नोकरीवर आधारलेले होते. तिला लहानपणापासून अभिनयात फार रस होता. आर्थिक परिस्थिती लक्षात घेत तिने मॉडेलिंगच्या विश्वाकडे आपला मोर्चा वळवला. समांथाच्या ‘मर्सल’ आणि ‘रंगस्थलम’ चित्रपटांनी उल्लेखनिय कामगिरी केली. या चित्रपटाच्या माध्यमांतून तिच्या लोकप्रियतेत भलतीच वाढ झाली. ‘ये माया चेसावे’ आणि ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटात दोघे एकत्र झळकले होते.

Leave a Comment