मोदी प्रचारदौऱ्यात म्हणून करतात एमएल १७ हेलिकॉप्टरचा वापर


लोकसभेच्या निवडणुकांसाठी आता चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी होत आहे. या काळात देशभरात बहुतेक सर्व राजकीय पक्ष नेते प्रचारासाठी अनेक सभा घेत असून प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. वेळ वाचवा आणि आहे त्या वेळेत अनेक सभा घेता याव्यात यासाठी बहुतेक नेते हेलिकॉप्टरचा वापर करताना दिसतात. पंतप्रधान मोदी याला अपवाद नाहीत मात्र ते विशिष्ट हेलिकॉप्टरचा वापर जास्त प्रमाणात करतात असे दिसते. हे हेलिकॉप्टर आहे भारतीय हवाई दलाचे एमआय १७.


हेच हेलिकॉप्टर पंतप्रधान वापरतात यामागे अनेक कारणे आहेत. हे सोविएत रशियन हेलिकॉप्टर आकाराने खूपच मोठे असून मिडीयम ट्वीन तर्बीन ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर आहे. ते लेटेस्ट तंत्रज्ञानाने युक्त असून त्याची बांधणी इतकी मजबूत आहे कि त्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा कोणताही परिणाम होत नाही. अतिशय सुरक्षित असे हे हेलिकॉप्टर १३००० किलोचे वजन वाहून नेऊ शकते आणि हवेत ताशी २५० किमीच्या वेगाने ६ हजार फुट उंचीवरून उडू शकते. यातून ३६ सशस्त्र सैनिक एकावेळी जाऊ शकतात. तसेच या हेलिकॉप्टरवरून अनेक घातक मिसाईल नेता येतात. त्यामुळे त्याचा युद्धात वापर केला जातो.

भारतीय हवाई दल अनेक अवघड मोहिमा पार पडताना या हेलिकॉप्टरचा वापर करतात त्यात बचावकार्याचा समावेश आहे. हे मिलिटरी ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर असून जवानांना एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी नेण्यासाठी ते वापरले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने हे एक प्रकारचे चिलखतच आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात याच हेलिकॉप्टरमधून एनएसजीचे कमांडो दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी उतरले होते. विशेष म्हणजे कोणत्याची परिस्थितीत हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षितपणे काम करू शकते.

Leave a Comment