चीन मध्ये उत्पादन प्रकल्प सुरु केलेल्या सुमारे २०० हून अधिक अमेरिकन कंपन्या चीन सोडून भारतात येण्याच्या तयारीत असल्याचे युएस इंडिया स्ट्रॅटीजिक अँड पार्टनरशिप फोरम (USISPF) या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले. चीन मध्ये सध्या २०० हून अधिक संखेने उत्पादन प्रकल्प असलेल्या या कंपन्या भारतील सध्याच्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भारतात येण्याच्या विचारात असल्याचे आणि त्यासाठी या कंपन्यांबरोबर चर्चा सुरु असल्याचे सांगितले.
चीन सोडून २०० कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत
USISPF ही स्वयंसेवी संस्था भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत होण्यासाठी काम करते. अमेरिकन कंपन्या चीन ऐवजी अन्य विकल्पंचा शोध घेत आहेत आणि त्यांना भारतात चांगल्या संधी आहेत असे मुकेश अघी म्हणाले. भारतात गुंतवणूक करून चीनला कसा पर्याय मिळविता येईल याची चर्चा या कंपन्या USISPF बरोबर करत आहेत. त्या संदर्भात USISPF नव्याने सत्तेवर येणाऱ्या सरकारला काय सल्ला देणार याविषयी बोलताना अघी म्हणाले आम्ही नवीन सरकारला व्यवसाय सुधारणांचा वेग अधिक वाढविण्याचा आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा सल्ला देणार आहोत.
इ कॉमर्स, लोकल डेटा स्टोरेज सारखे निर्णय अमेरिकन कंपन्या स्थानिककारक न मानता आंतरराष्टीय हिताचे मानत आहेत असे सांगून ते म्हणाले यामुळे नवीन सरकारने निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शी ठेवणे फायद्याचे ठरणार आहे.