असा आहे २० रुपये नोटेचा इतिहास


भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच २० रुपये मूल्याची नवी नोट जारी करणार आहे. भारताच्या चलनी नोट इतिहासात २० रु. मूल्याच्या नोटा सुमारे १५७ वर्षांपासून वापरात असल्याचे संदर्भ दिले जातात. असे मानले जाते की १५ मे १८६२ पासून २० रुपये मूल्याच्या चलनी नोटा वापरल्या जात आहेत. आजपर्यंत ६ वेळा या नोटेचे डिझाईन बदलले गेले आहे.


अशी माहिती मिळते की १८६२ साली भारतावर ब्रिटीश राज्य करत होते व तेव्हा २० रु. मूल्याच्या ज्या नोटा जारी केल्या गेल्या त्यांची छपाई अलाहाबाद प्रिंटींग प्रेस मध्ये केली गेली होती. त्यानंतर १९०१ सालात या नोटा नव्या डिझाईनसह पुन्हा छापल्या गेल्या त्यावर हिंदी, उर्दू, बंगाली आणि गुजराथी भाषेत बीस रुपया अशी अक्षरे होती. त्यानंतर थेट १९७२ मध्ये २० रुपये मूल्याची नवी नोट चलनात आली त्यावे संसद भवनाचे चित्र होते. १९८० मध्ये पुन्हा त्यात बदल केला गेला आणि कोणार्क मंदिराचे चक्र असलेल्या नोटा चलनात आल्या. २००१ मध्ये पुन्हा यात बदल झाला आणि आज त्याच नोटा चलनात आहेत. या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा असून त्यात दुसरीकडे समुद्रकिनारा आहे.


आता २००१ नंतर २०१९ मध्ये पुन्हा नवी २० रुपये मूल्याची नोट चलनात येणार आहे. २५ वर्षापूर्वी संसद भवनाची प्रतिमा असलेली पहिली केशरी रंगाची नोट चलनात आली त्यावर रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर जगन्नाथन यांची सही होती आणि प्रत्येक नोटेचे सी १० प्रेफिक्स होते. त्यात काश्मिरी भाषेत चूक झाली होती. या नोटा संग्रहाकांकडून खूप डिमांडमध्ये होत्या आणि त्यासाठी ६० हजार ते १ लाख रुपये मोजले जात होते असे सांगतात. आरबीआयचे माजी गव्हर्नर सी रंगराजन, जलन आणि वाय.व्ही रेड्डी यांच्या सह्या असलेल्या २० रुपयांच्या नोटाही चलनात आल्या होत्या.

Leave a Comment