छिंदवाडा – महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा काँग्रेस हा पक्ष असून त्यांचे देशाच्या स्वातंत्र्य आणि विकासामध्ये महत्वाचे योगदान असल्यामुळेच मी काँग्रेस पक्षात सहभागी झालो असल्याचे वक्तव्य मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.
त्यामुळेच मी काँग्रेस पक्षात आलो – शत्रुघ्न सिन्हा
पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांची सिन्हा यांनी स्तुती केली आहे. ते म्हणाले, देशासाठी काँग्रेसने मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही. दरम्यान, आपल्या डायलॉगबाजीच्या अंदाजात त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा सडकून टीका केली. पक्ष व्यक्तीपेक्षा मोठा असतो आणि देश पक्षापेक्षा मोठा असतो. देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. नोटाबंदीनंतर मोदींनी जेव्हा जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारले खायला दिल्यासारखे होते, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली.