अॅपल कंपनीवर 18 वर्षीय विद्यार्थ्याने ठोकला 7000 कोटींचा दावा


न्यूयॉर्क- अॅपल कंपनीविरूद्ध 1 अब्ज डॉलर (7000कोटी रूपये) चा दावा येथील एका विद्यार्थ्याने ठोकला आहे. कोर्टात 18 वर्षीय ओस्मान बाह याने याचिका दाखल केली. ओस्मानचे म्हणने आहे की, अॅपलच्या फेशिअल-रिकग्निशन सॉफ्टवेअरने त्याचे नाव अॅपल स्टोरमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेशी लिंक केल्यामुळे पोलिसांनी नोव्हेंबर 2018 मध्ये त्याला अटक केली होती.

बाहने सांगितल्यानुसार ज्या व्यक्तीचा फोटो पोलिसांच्या वॉरंटमध्ये होता, तो अजिबात माझ्याशी मिळता-जुळता नव्हता. मला अॅपल स्टोअरमधील चोरीच्या ज्या घटनेत आरोपी बनवले गेले, त्यातील एक प्रकरण बोस्टनचे आहे. पण घटना ज्या दिवशी घडली त्यादिवशी मी मॅनहट्टनमध्ये होतो.

ओस्मान म्हणाला, त्याचे फोटो नसलेले लर्नर परमिट हरवले होते. ते परमिट बहुदा चोराला सापडले असावे आणि त्याने माझ्या आयडीचा अॅपल स्टोरमध्ये वापर केला असावा. यामुळे अॅपलच्या सॉफ्टवेअरने त्याचे नाव चोरांच्या चेहऱ्यासोबत जोडले असेल. अॅपल चोरीच्या घटनेत संशयित लोकांना ट्रॅक करण्यासाठी आपल्या स्टोर्समध्ये फेशिअल-रिकग्निशन सिस्टीमचा उपयोग करते. पीडित विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की, त्याला खोट्या आरोपांमुळे मानसिक तणाव आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागला. न्यूजर्सीत अॅपल स्टोरमध्ये चोरीच्या घटनेच्या प्रकरणात बाहविरूद्ध आतापर्यंत केस चालू आहे, पण इतर प्रकणातून त्याची निर्दोष सुटका झाली आहे.

Leave a Comment