सलमानने शेअर केले ‘दबंग ३’चे पोस्टर


‘दबंग’ आणि ‘दबंग २’च्या दमदार यशानंतर सलमान खानचा ‘दबंग ३’ यावर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवरून खुद्द सलमाननेच शेअर केले आहे. २० डिसेंबर २०१९ ही प्रदर्शनाची तारीखही पोस्टरच्या माध्यमातून घोषित करण्यात आली आहे.

पोलिसाची वर्दी घातलेला सलमान आणि त्याच्या छातीवर ‘चुलबुल पांडे’ असा बॅज लावलेला ‘दबंग ३’च्या नव्या पोस्टरमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये सलमानचा चेहरा दिसत नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख या पोस्टरवर २० डिसेंबर २०१९ अशी लिहिली आहे. हे पोस्टर सलमानच्या चाहत्यांना अतिशय भावले आहे. सर्व चाहते चुलबुल पांडेच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


डिसेंबर महिन्याच्या २५ तारखेला रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांच्या तारखांमध्ये ५ दिवसांचे अंतर असले तरी ‘दबंग ३’ आणि अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ यात टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment