प्रज्ञा ठाकूर आहे राष्ट्रवादी महिला : बाबा रामदेव


पाटणा : योग गुरु बाबा रामदेव यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी प्रज्ञा ठाकूर दहशतवादी नसून राष्ट्रवादी महिला असल्याचे मत व्यक्त केले आहे. पाटणा साहिब येथून लोकसभा निवडणूक मैदानात असणाऱ्या भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उमेदवारी अर्जाच्या वेळी ते उपस्थित होते.

फक्त संशयावरून ठाकूर यांना 9 वर्षांपर्यंत तुरुंगात छळले गेले, असाही दावा रामदेव यांनी केला. ते म्हणाले, एका व्यक्तीला फक्त संशयावरुन अटक करण्यात आली आणि तिला 9 वर्षांपर्यंत शारिरीक आणि मानसिक त्रास देण्यात आला. ज्या तणावातून त्यांना जावे लागले त्यामुळे त्यांना कँसरला सामोरे जावे लागले. प्रज्ञा ठाकूरचा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना संशय होता. यावर विचारणा केली असता रामदेव यांनी उत्तर देणे टाळले.

Leave a Comment