अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने केली जडेजा, बुमराह आणि शमीच्या नावाची शिफारस


मुंबई : यंदा अर्जुन पुरस्कारासाठी चार क्रिकेटरच्या नावांची शिफारस बीसीसीआयने केली आहे. रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मह शमी यांच्या नावाचा यात समावेश आहे. तर, यासोबतच पुनम यादव या महिला क्रिकेटपटूचाही समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, बीसीसीआयने नुकताच इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. त्यात जडेजाच्या नावाचा अनपेक्षितपणे समावेश करण्यात आला आहे. भारताचे शमी आणि बुमराह हे प्रमुख गोलंदाज आहे. मागील काही वर्षांत या दोघांनी परदेशात आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धींना हतबल केले आहे. अल्पावधीतच बुमराहने भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. 49 वन डे सामन्यांत बुमराहने 85 विकेट्स घेतल्या आहेत. तर 63 वन डे सामन्यांत शमीनेही 113 विकेट्स नावावर केल्या आहेत.

मागच्या वर्षी भारताला पुनम यादव या 27 वर्षीय महिला फिरकीपटूने चांगल यश मिळवून दिले. ती सध्या महिला क्रिकेटमध्ये 10व्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 41 एकदिवसीय सामने तर, 54 टी-20 सामने पूनमने खेळले आहेत.

Leave a Comment