पहिल्याच दिवशी ‘अॅव्हेंजर्स’ने जगभरात जमवला एवढ्या कोटींचा गल्ला


मुंबई: रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, क्रिस इवान्स, मार्क रुफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट योहान्सन आणि ब्री लारसन यांची ‘अॅव्हेंजर्सः एण्डगेम’मध्ये प्रमुख भूमिका असून मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ‘अॅव्हेंजर्स: एण्डगेम’ हा 22वा चित्रपट आहे. ‘कॅप्टन मार्वेल’ याआधी प्रदर्शित झाला होता. मृत्यूपूर्वी अमेरिकन कॉमिक बुक्सचे आणि मार्वेलचे लेखक स्टॅन ली यांनीदेखील एण्डगेममध्ये कॅमिओ केला आहे.

‘अॅव्हेंजर्स: एण्डगेम’ तिकीट विक्रीच्या बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यासंदर्भात बुकमायशोने दिलेल्या माहितीनुसार, ‘अॅव्हेंजर्स: एण्डगेम’च्या 10 लाखांपेक्षा जास्त तिकीटांची एकाच दिवशी विक्री झाली आहे. प्रति सेंकद 18 तिकीटे या वेगात विक्री झाली आहे. हा चित्रपट काल रिलीज झाला आहे.

या चित्रपटाच्या तिकीटावर अॅव्हेंजर्सचे चाहतेही पैसे खर्च करत आहेत. या चित्रपटाच्या आतापर्यंत सर्वात महागड्या तिकीटाची विक्री झाली आहे. तब्बल 2400 रुपयांना तिकीट विकले गेले आहे. या चित्रपटाचे दिल्लीतील एका थिएटरमध्ये तिकीट सर्वात महागडे होते. मुंबईत आयनॉक्सने सर्वात महागडे तिकीट विकले होते. 1765 रुपये या तिकीटाची किंमत होती.

सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड्स ब्रेक करण्याच्या मार्गावर ‘अॅव्हेंजर्सः एण्डगेम’ असून चित्रपट प्रदर्शित होताच याची कमाई 1200 कोटींपर्यंत पोहोचली. यातील केवळ चायनाचा वाटा आहे. एण्डगेमसाठी मोठे मार्केट ठरलेल्या चायनासोबतच साऊथ कोरियामध्ये 8.4 मिलियन डॉलर्स, ऑस्ट्रेलियामध्ये 7 मिलियन डॉलर्स, फ्रान्समध्ये 6 मिलियन डॉलर्स, इटलीत 5.8 मिलियन डॉलर्स, तर जर्मनीमध्ये 5.6 मिलियन डॉलर्स एवढी कमाई झाली.

Leave a Comment