दिग्दर्शनक्षेत्रात आशा भोसले यांचे पदार्पण


बऱ्याच दिवसांपासून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा आगामी ‘पानीपत’ चित्रपट चर्चेत आहे. कर्जतमध्ये अलिकडेच या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग करण्यात आले. आशा भोसले यांच्या दिग्दर्शनाखाली यातील एका भागाचे शूटिंग हे झाले आहे.

आता दिग्दर्शन क्षेत्र आपल्या मधुर आवाजाने संगीतक्षेत्र गाजवणाऱ्या आशा भोसले यांना खुणावू लागले आहे. त्यांनी गायनाद्वारे आपल्या आवाजाने चाहत्यांवर भूरळ पाडली आहे. त्या अचानक ‘पानीपत’च्या शूटिंगदरम्यान सेटवर पोहोचल्या होत्या. तिथे त्यांना पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.

याबाबत माध्यमांशी बोलताना आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले की, सेटवर आशा भोसलेंनी हजेरी लावल्यानंतर सेटवर उत्साही वातावरण निर्माण झाले होते. त्यांचा उत्साह पाहून सर्वांना आनंद झाला होता. त्याचबरोबर, तर काही दृश्यांचे त्यांनी दिग्दर्शनही केले. मी एवढे नक्की सांगू शकतो की, आशा भोसले यांची गायनावर ज्याप्रकारे पकड आहे. तसेच त्या दिग्दर्शनामध्येही चपखल आहेत.

आशा भोसले यांनी दिग्दर्शित केलेल्या त्या सिनमध्ये पद्मिनी कोल्हापुरे आणि मोहनीश बहेल यांनी भूमिका साकारली आहे. अर्जुन कपूर हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. १७६१ साली झालेल्या ‘पानीपत’च्या लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a Comment