गायक दलेर मेहंदी यांचा भाजपमध्ये प्रवेश


नवी दिल्ली : आज भाजपमध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी प्रवेश केला आहे. यावेळी दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल हेदेखील उपस्थित होते. दलेर मेहंदी यांचा पक्षप्रवेश दिल्ली कार्यालयात पार पडला. यादरम्यान उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजप उमेदवार हंसराज हंस, केंद्रीय मंत्री आणि चांदणी चौकचे उमेदवार हर्षवर्धन तसेच पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

हंसराज हंस यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना भाजपने उत्तर पश्चिम दिल्ली मतदार संघातून तिकीट देऊन मैदानात उतरवले. हंसराज हंस यांचे दलेर मेहंदी हे व्याही आहेत. हंसराज हंस यांचा मुलगा नवराज हंस आणि दलेर मेहंदी यांची मुलगी अवजीत कौर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते.

Leave a Comment