सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘देसी गर्ल’चा ‘मंगळसुत्र लूक’


निक जोनाससोबत बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा दमदार प्रवास करणारी बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ लग्नानंतर ‘परदेसी गर्ल’ बनली आहे. जोधपूरमध्ये मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात शाही लग्नसोहळा पार पडल्यानंतरही प्रियंका सतत चर्चेत असते. प्रियंका आपल्या भावाच्या लग्नासाठी नुकतीच मुंबईत दाखल झाली आहे. प्रियंकाचा यावेळी एका पिवळ्या रंगाच्या शर्टातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियंकाचा हा लूक व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे, प्रियंकाने मंगळसूत्र परिधान केलेले या फोटोत दिसत आहे. तिच्या फॅन्सना तिचा हा मंगळसूत्र लूक भलताच पसंत पडला आहे. प्रियंकाने नाजुक असे मंगळसुत्र घालून स्टाईलीश अंदाजात चाहत्यांवर भूरळ पाडली आहे. नुकतीच प्रियंका आपल्या भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झाली आहे.

लग्नबंधनात प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा अडकणार आहे. प्रियंका त्याच्या लग्नासाठी मुंबईला आली आहे. अलिकडेच प्रियंकाने ‘द स्काय ईज पिंक’ या चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. तसेच, निकबरोबरही तिने ‘द सकर्स’ गाण्यात काम केले आहे. सध्या ती तिचे वैवाहिक आयुष्य आनंदाने घालवत आहे.

Leave a Comment