देशातील कोणतीही महिला सुरक्षित नाही – शबाना आझमी


पाटणा – बिहारच्या बेगुसराय लोकसभा मतदार संघामध्ये सीपीएमचे उमेदवार कन्हैया कुमार यांचा प्रचार करण्यासाठी आलेल्या सिने अभिनेत्री शबाना आझमी यांनी पंतप्रधान मोदी देशातील महिलांच्या सुरक्षेची गोष्ट करतात. मात्र, देशामध्ये महिलेला कोणतीही सुरक्षा मिळालेली नाही, असा घणाणात केला आहे. त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर टीकांचा वर्षाव केला.

देशातील गरीबी कमी करण्याचे मोदी म्हणतात, पण मागील ५ वर्षात थोडीही गरीबी कमी झालेली नसल्याचेही आझमी यांनी म्हटले. देशाला तोडण्याचे काम मोदी यांनी केले. त्यांनी हिंदू मुस्लीमांचे मुद्दे उपस्थित करून दंगे पसरवण्याचे काम केले, असा आरोपही शबाना यांनी यावेळी केला.

त्यांनी मोदी यांच्या विकासाच्या मॉडेलवरही जहरी टीका केली. विकासाच्या नावावर मोदी मत मागतात. पण, खरे म्हणजे ते आपल्याला ठेंगा दाखवत आहेत. मोदी कन्हैया कुमार बद्दल खोट्या अफवा पसरवतात. त्याला बदनाम करण्याचे काम करतात. त्यांचे मतदान तोडण्याचे काम करतात, असेही आझमी यावेळी म्हणाल्या.

अभिनेते प्रकाश राजही यावेळी उपस्थित होते. कन्हैया कुमार बद्दल त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटले, की देशात दोन पुत्र आहेत. त्यापैकी एक सुपुत्र तर दुसरा कुपुत्र आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे कुपुत्र आहेत. तर, कन्हैया देशाचे सुपुत्र आहेत, असे त्यांनी म्हटले.

Leave a Comment