पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटलांच्या विजय संकल्प सभेत बोलताना राज्याचे आरोप पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी हा पक्ष पवार कुटुंबियांची खाजगी मालमत्ता असून हे कधी कुणाला काढतील आणि कधी कुणाला झाकतील याचा भरोसा राहिलेला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून पवार कुटुंबियाची खाजगी मालमत्ता असून ते कधी मुलीला, कधी पुतण्याला तर कधी नातवाला उभा करतील याचा नेम नसल्याचा घणाघात केला.
राष्ट्रवादी हा पक्ष पवारांची खाजगी मालमत्ता – गिरीष बापट
बापट पुढे म्हणाले, पन्नास वर्षात यांच्या बापजाद्यांना जे करता आले नाही ते पाच वर्षांमध्ये भाजप सरकारने करून दाखवले आहे. त्यामुळे आता आघाडी सरकारची घालमेल होत आहे. माझ्या विरोधात पुण्यात त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार मिळाला नाही, मग मलाच लक्ष घालावे लागल्याचेही बापट यांनी सांगितले. तसेच बापट डॉ. अमोल कोल्हेंवर टीका करताना म्हणाले की, राष्ट्रवादीने पाच वर्ष बिळात लपलेल्या डॉ. कोल्हेंना तिकीट दिले. डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस कंपनीने सीईओ केले आहे. पण, या सीईओला यांच्या दारात निवडणूक झाली की चपराशी म्हणून उभा करतील.
माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची गिरीष बापटांनी यावेळी चांगलीच खिल्ली उडवली. बापट म्हणाले की, निवडणूक आली की आमचे मित्र दिलीप वळसे-पाटील आजारी पडतात. त्यांना ताप भरतो. कारण शरद पवार बळीचा बकरा मलाच करणार असे वळसे-पाटील सांगतात. दिलीपरावांचा आढळरावांच्या विरोधात थांग लागणार नसल्यामुळे आपली दुधाची डेअरी बरी. तो जनावरांचा चारा बरा आणि तेथील शेण बरे त्यामुळे दिलीप वळसे-पाटील तेथेच बसून राहिले, असा खोचक टोला बापटांनी वळसे पाटलांना लगावला.