जाणून घेऊया काही अजब झाडांबाबत


जग हे रहस्याने भरलेले आहे. त्याची प्रचिती आम्ही अनेकदा तुम्हाला करुन दिली आहेच. जगभरात तेथील वातावरणानुसार झाडे पहायला मिळतात. ती झाडे आपल्या वैशिष्ट्यमुळे ओळखली जातात. आम्ही आज तुम्हाला अशाच काही झाडांबद्दल सांगणार आहोत. ज्यांची प्रसिद्धी जगभरात आहे.

अमेरिकेतील योसेमाइट नॅशनल पार्कमधील वावोना ट्री नावाच्या एका झाडामधून बोगदा तयार करण्यात आला होता. 1969 मध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे 227 फूट लांब असलेले हे झाड खाली कोसळले. पण या जागी आता अनेक प्राण्यांनी आसरा घेतला आहे.

दक्षिण अफ्रिकेतील मोडजाडजिसक्लूफमध्ये सनलँड बोआब ट्री आहे. सनलँड बोआब हे झाडाची लांबी ही 72 फूट तर रुंदी 155 फूट आहे. 1933 मध्ये एक बार या झाडाच्या आत सुरू करण्यात आला होता. फक्त 15-20 माणसे त्यावेळी आत बसू शकत होती. पण आता या झाडात 60 लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

ड्रॅगन्स ब्लड ट्री उत्तर-पश्चिम अफ्रिकेच्या कॅनरी बेटावर असून एक ड्रॅगन मेल्यानंतर त्याचे झाड झाले अशी याबाबत आख्यायिका आहे. रक्ताच्या रंगासारखे एक विशिष्ट द्रव्य या झाडाच्या खोडातून बाहेर पडते. त्यामुळेच या झाडाला ड्रॅगन्स ब्लड ट्री असे म्हटले जाते.

कंबोडियातील एक प्रसिद्ध प्राचीन मंदिरावर असलेले सिल्क कॉटन ट्री हे आहे. वर्षानुवर्षे याच्या फांद्या वाढत असल्याने आजुबाजूचा परिसर सुंदर दिसत आहे.

बोआब ट्री ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट डर्बी शहरात हे झाड आहे. पण एक जेल या झाडामध्ये तयार करण्यात आले असून त्याचा वापर कैदयांना ठेवण्यासाठी केला जातो.

पोलंडमधील ग्राइफिनो शहरात विचित्र आकाराची क्रूक्ड फॉरेस्ट 400 झाडे आहेत. रहस्य म्हणून या झाडांकडे पाहिले जाते.

जगभरातील धोकादायक झाडांपैकी बॉटल ट्री हे एक असून ही झाडे नामिबियामध्ये आहेत. ही झाडे बॉटलसारखी असल्याने त्यांना बॉटल ट्री असे म्हटले जाते.

फिलिपीन्समध्ये इंद्रधनुषी यूकलिप्टस हे झाड आहे. रंगीबेरंगी या झाडाचे खोड असून या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो.

Leave a Comment