दुबईमधील पंजाबी मजूराने जिंकली 1.5 कोटींची कार


नवी दिल्ली- दुबईमध्ये मागील दहा वर्षांपासून पंजाबमधील बलवीर सिंग सुतार काम करत आहेत. घराची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे दूबईमध्ये ते नोकरीच्या शोधात गेले होते. त्यांचे नशीब दुबईत अशा पद्धतीने बदलेल असा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.

युएईच्या रजिस्ट्रेशन पॉलिसीनूसार मोबाइल क्रमांक रिन्यू करण्याची एक स्पर्धा अमीरेत इंटीग्रेटेड टेलीकम्यूनिकेशन कंपनी (EITC) ने सुरू केली होती. ग्राहकांना या अंतर्गत कोएक्सपायरी आयडी रिन्यू करण्यासाठी आपला मोबाइल क्रमांक 31 जानेवारीच्या आधी रजिस्टर करायचा होता. बलवीरनेही इतर ग्राहकांप्रमाणे आपले रेजिस्ट्रेशन केले. बलवीरला काही दिवसांनी कंपनीतर्फे कार जिंकल्याचा फोन आला, त्यांना तेव्हा यावर विश्वास बसला नाही. त्यांना वाटले कोणीतरी प्रॅंक कॉल करत आहे. पण ही गोष्ट जेव्हा खरी असल्याचे कळाले तेव्हा बलवीरला खूप आनंद झाला. तर अशा पद्धतीने बलवीर सिंग McLaren 570S स्पायडर कारचे विजेते ठरले. या कारची किंमत 1.5 कोटी रूपये आहे.

जगभरातील बनवण्यात येणाऱ्या काही निवडक गाड्यामध्ये McLaren 570S स्पायडरचा समावेश होतो. 3.8 लीटर ट्विन टर्बोचार्ज्ड v8 इंजिन कारमध्ये देण्यात आले आहे, जे 562bhp पॉवर आणि न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. याची टॉप स्पीड 328 कि.मी. प्रति तास आहे. ही कार 3.2 सेंकेंडमध्ये जीरो ते 100 कि.मी.च्या गतीने धावते. ही कार बलवीरने जरी जिंकली असली तरी त्यांचा कार विकून नवा व्यवसाय सुरू करायचा प्लॅन आहे. बलवीरचा हा निर्णय खूप चांगला आहे कारण या कारचे मेंटेनंस खूप महाग आहे.

Leave a Comment