नवरी शब्द महिलेसाठीच नव्हे, तर तृतीयपंथीयांसाठीही वापरता येईल – उच्च न्यायालय


मदुराई – मद्रास उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यात तृतीयपंथी हीसुद्धा नवरीच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. केवळ महिलेशी संबंधित विवाह कायद्यात दिलेली व्याख्या असेल, अशी आवश्यकता नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एक पुरुष व एक तृतीयपंथी यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर वरीलप्रमाणे निर्णय न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांनी दिला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तुतिकोरीनमध्ये झालेल्या त्यांच्या लग्नास नोंदणीकृत करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. दोघांनी त्यानंतर न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना, न्यायालयाने त्यांच्या लग्नाची नोंदणी करून घेण्याचे आदेश विवाह नोंदणी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय व महाभारत व रामायण या प्राचीन ग्रंथाचा संदर्भ देताना स्वामीनाथन यांनी सांगितले, हिंदू विवाह कायद्यात दिलेल्या “नवरी’ शब्दांचा अर्थ मर्यादित स्वरूपाचा नाही, असे म्हटले. नवरी शब्द एक महिलेसाठीच नव्हे, तर तृतीयपंथीसाठीही वापरता येईल, असे म्हटले. त्यांनी तृतीयपंथीयांच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना, त्यांना कलंक म्हटले जाते, त्यांना घरही सोडावे लागते, यावर विचार व्हावा, असे म्हटले.

Leave a Comment