या कारणामुळे फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपने हटवल्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त पोस्ट


फेसबुक, ट्विटर, गुगल आणि व्हॉट्सअॅपने निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानंतर आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास 80 टक्केपेक्षा जास्त पोस्ट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकल्या. मतदानाच्या 48 तास अगोदर सोशल मीडियावर राजकीय जाहिरातबाजी करणाऱ्या या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांतील आचार संहितेदरम्यान या चारही सोशल मीडिया कंपन्यांनी राजकीय पक्षांची जाहिराबाजी करणाऱ्या जवळपास 537 पोस्ट काढून टाकल्या. 468 पॉलिटिकल पोस्ट आणि 60 पॉलिटिकल जाहिरातबाजी पोस्ट फेसबुकने डिलीट केल्या. अशाच पद्धतीने ट्विटरनेसुद्धा आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या 8 पोस्ट काढून टाकल्या. तर दोन व्हिडिओ गुगलने रिमुव्ह केले. या शिवाय राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्या 37 पोस्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

फेसबुकने मंगळवारी पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अखेरपर्यंत दोन पोस्ट डिलीट केल्या. ट्विटरने 34 आणि व्हाट्सअॅपने एक पोस्ट रिमुव्ह केली. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मतदारांना संभ्रमित करणाऱ्या 10 पोस्ट, सामाजिक नैतिकतेचं आणि सभ्यतेचं उल्लंघन करणाऱ्या 28 पोस्ट आणि लोकांच्या भावना भडकवणाऱ्या 8 पोस्ट फेसबुकने काढून टाकल्या.

मतदारांना संभ्रमित करणाऱ्या 5 पोस्ट, लोकांच्या भावना भडकवणाऱ्या 2 पोस्ट ट्विटरने रिमुव्ह केल्या. तर गूगलने लोकांच्या भावना भडकवून त्यांना प्रभाविक करणारा एक व्हिडिओ युट्युबवरून काढून टाकला. तर व्हॉट्सअपने अशाच प्रकारच्या 2 पोस्ट रिमुव्ह केल्या. सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आलेल्या पोस्टसंदर्भातील ही आकडेवारी 10 मार्चपासूनची आहे.

Leave a Comment