शान की सवारी अॅम्बेसेडर नव्या रुपात पुनरागमन करणार


भारतात अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत डिप्लोमॅटस आणि ब्युरोक्रॅटस यांच्यासाठी खास व्हीआयपी सवारी म्हणून वापरत असलेल्या अॅम्बेसेडर पुन्हा एकदा नव्या रुपात भारतात पुनरागमन करणार असून यावेळी त्या इलेक्ट्रिक स्वरुपात दाखल होणार आहेत असे समजते. २०१७ मध्ये हिंदुस्तान मोटर्ससह फ्रांसच्या पीएसए प्युजो सित्रोईन समूहाने संयुक्त व्हेन्चर करून अॅम्बेसेडर नेमप्लेट मिळविली होती. हा ब्रांड ८० कोटी रुपयात खरेदी केल्यानंतर आता कंपनी पुन्हा एकदा अॅम्बेसेडर आयकॉनिक स्वरुपात लाँच करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत.

गेल्या जमान्यातील ही शाही सवारी आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये येत असून भारतात या गाडीची असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन इलेक्ट्रिक अॅम्बेसेडर फक्त भारतातच लाँच करण्याची तयारी सुरु आहे असे समजते. अॅम्बेसेडर ब्रांडखालीच इलेक्ट्रिक कार्सची संपूर्ण रेंज सादर केली जाणार असून त्यात प्रिमीयम, हचबॅक, कॉम्पॅक्ट एसयुव्ही वा क्रॉसओव्हर कार्स लाँच केल्या जाणार आहेत. पॉवरसाठी सित्रोईन इंजिनच वापरले जाणार असून या कार्स २०२२ पर्यंत भारताच्या बाजारात दाखल होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

ही कर सिंगल चार्जिंगवर ३२० किमीचे अंतर कापेल असेही सांगितले जात आहे. वास्तविक सित्रोईनचा प्रिमीयम ब्रांड डीएसने युरोप मध्ये इ टेन्स बॅज खाली इलेक्ट्रिक वाहन रेंज बनविण्याची घोषणा केली होती आणि डीएस ३ क्रॉसबॅज इ टेन्सला अॅम्बेसेडरचा पुनरअवतार मानले जात आहे.

Leave a Comment