भूतानचे डॉ. पंतप्रधान करतात मोफत रुग्णसेवा


आपला शेजारी देश भूतान. या देशाचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग नुकतेच एका फोटोमुळे सोशल मिडीयावर चर्चेत आले होते. हा फोटो त्यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकौंटवरून शेअर केला होता. यात ते त्यांच्या पत्नीच्या पायाला रस्त्यातला चिखल लागू नये म्हणून तिला पाठुंगळी घेऊन रस्त्यावरून जाताना दिसले होते. या फोटोखाली त्यांनी दिलेले कॅप्शन मोठे सुरेख होते. त्यात ते म्हणाले मी सर वॉल्टर इतका महान नाही, मात्र कोणत्याची पुरुषाने त्याच्या पत्नीचे पाय साफ ठेवण्यासाठी जे करायला हवे ते केले आहे. हा फोटो १२ सप्टेंबररोजी शेअर केला गेला होता.


त्यानंतर पुन्हा एकादा डॉ. शेरिंग चर्चेत आले आहेत ते त्यांच्या आयुष्यातील आणखी एका पैलू मुळे. राजकारणात येण्यापूर्वी ते डॉक्टरचा व्यवसाय करत होते आणि आता पंतप्रधान झाल्यावरही ते सोमवार ते शुक्रवार निराळ्या अर्थाने जनसेवा करतात तर विकएंडला सर्जन बनून रुग्णसेवाही करतात. यात बहुतेक रुग्ण ते मोफत तपासतात. शेरिंग यांनी बांग्ला देशातील ढाका विध्यापितःच्या मामंसिंग मेडिकल कॉलेज मधून पदवी घेतली आहे आणि त्यानंतर अमेरिकेत मेडिकल कॉलेज ऑफ विस्कोन्सिन मधून युरोलोजीची पदवी मिळविली आहे. त्यानंतर ते मायदेशी परतले तेव्हा भूतान मधील ते एकमेव युरोलॉजिस्ट होते. तेव्हाही ते विकएंड मध्ये मोफत सर्जरी करत. बेस्ट सर्जन अशी त्यांची देशात ओळख आहे.

आजही पंतप्रधान पदाची जबाबदारी पार पाडत असताना ते भूतान राजधानीत जिग्मे दोरजी वांगचूक नॅशनल रेफरल हॉस्पिटल मध्ये काम करतात आणि सर्जन म्हणून काम करत असतानाच सकाळी ७.३० ते १० पर्यंत ज्युनिअर डॉक्टरना प्रशिक्षित करतात. युरोलोजीमध्ये ते गेली ११ वर्षे प्रॅक्टीस करत आहेत.

Leave a Comment