या देवांना फुटतो सतत घाम?


भारत हा अनेक रहस्यमय गोष्टी हृदयात दडवून ठेवलेला देश आहे असे म्हटले तर ते गैर ठरणार नाही. भारतात अंधश्रद्धा खूप आहे. लोकांचा देवावर खूपच विश्वास आहे अशी आपली जगभर ख्याती आहे. येथे लाखोनी मंदिरे आहेत आणि त्यातील अनेक मंदिरे काही न काही रहस्य पोटात बाळगून आहेत. विशेष म्हणजे अनेक संशोधकांनी या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न करूनही त्यामागचे गूढ उलगडलेले नाही. यातील एक चमत्कार म्हणजे भारतातील काही प्रसिद्ध मंदिरातील देवाच्या मूर्तीमधून पाणी येणे हा आहे. विशेष म्हणजे अश्या ज्या मूर्ती आहेत त्यात जगप्रसिद्ध तिरुपतीच्या मूर्तीचाही समावेश आहे.


पहाडी भागात आणि नेहमीच थंड हवामान असलेले हिमाचल राज्य. येथील प्रसिद्ध भलेई माता हे सिद्धपीठ त्यातील एक. हे प्राचीन मंदिर असून तेथे देवीची स्वयंभू मूर्ती आहे. जेथे ही मूर्ती प्रकट झाली तेथेच मंदिर बांधले गेले आहे. या मूर्तीला घाम येतो आणि अनेकदा संशोधन करूनही त्यामागचे कारण कळलेले नाही. पुरातत्व विभाग सुधा या मागचे कारण सागू शकलेला नाही.


दुसरे असे स्थान तामिळनाडू कार्तिकेय मुरुगाचे सिक्कल सिंगारवेलूवर मंदिर. येथील मूर्तीतून असेच पाणी येते. विशेष म्हणजे येथे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये उत्सव होतो त्यावेळी हे पाणी अधिक प्रमाणात येते आणि उत्सव संपत आला कि हळू हळू कमी होते. यामागे भाविकांचा असा विश्वास आहे, राक्षस सुरापद्मन वर सुब्रह्मण्यम याने विजय मिळविला त्याच्या आनंदाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा होतो. या मूर्तीला जो घाम येतो, राक्षसाचा वध करण्यासाठी सुब्रह्मण्यम वाट पाहत असताना त्याला आलेल्या क्रोधाचे प्रतिक आहे.


आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील प्रसिद्ध तिरुपती बालाजी वेंकटेश्वरची मूर्ती वारंवार ओली होते आणि पुजारी ती सतत कापडाने पुसत असतात. या ठिकाणी तापमान खूप जास्त नाही, थंडी मध्ये तर चांगलेच गार असते तरीही मूर्ती ओली होत असते. मूर्तीची पाठ तर सतत ओली राहते आणि बाहेर कितीही तापमान असले तरी या मूर्तीचे तापमान नेहमी ११० फॅरनहिट असते.


मध्यप्रदेशातील जबलपूर येथील कालीमातेच्या प्राचीन मंदिरातील देवीला तर उकाडा अजिबात सहन होत नाही. या मूर्तीला सतत घाम येतो. त्यामुळे मंदिरात २४ तास एसी लावला जातो. चुकून कधी एसी बंद पडला तर मूर्तीतून घामाच्या धारा लागतात. भाविक मातेचा हा चमत्कार मानतात.

Leave a Comment