जावेद हबीब यांच्या भाजप प्रवेशानंतर सोशल मिडियावर मिम्सचा पूर


भारतातील जानेमाने हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब यांनी भाजपचे सदस्यत्व घेतल्यावर सोशल मिडीयावर मिम्सचा जणू पूर आला आहे. जावेद यांच्या ग्राहकांमध्ये सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सेलेब्रिटी, खेळाडू आहेत तसेच त्यांचा फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अश्या वेळी हबीब यांनी भाजपची निवड केली असल्याने त्याची विशेष चर्चा होत आहे.


निवडणूक काळात सर्वच राजकीय पक्ष सेलेब्रिटीना त्यांच्या पक्षात ओढण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण या सेलेब्रिटीचा चेहरा देशातील सर्वसामान्य मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करेल अशी आशा त्यामागे असते. जावेद यांनी भाजप मध्ये येताना आत्तापर्यंत ते केसांचे चौकीदार होते आता देशाचे चौकीदार होणार आहेत असे सांगितले होते. हबीब यांच्या काही केशरचना खूपच गाजलेल्या आहेत आणि सोशल मिडीयावर त्याचा वापर अनेकांनी मोदी, अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोवर मिम्स बनविण्यासाठी केला आहे. हे मिम्स इतके मजेदार आहेत की ते पहिल्यावर हसू आवरणे अवघड आहे.


यात मोदी शहा यांची हेअरस्टाईल बदलली गेली आहे तोच प्रकार फडणवीस आणि योगी आदित्यनाथ याच्याबाबत केला गेला आहे. जावेद यांनी हे मिम्स त्यांनी पाहिल्याचे आणि चेष्टेपलीकडे त्याला अधिक महत्व न दिल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, मी भाजपची निवड केली कारण मी जसे लोकांचे केस स्वच्छ करतो तसे मोदी देश स्वच्छ करत आहेत. मी निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक नाही पण पक्षाची तशी अपेक्षा असेल तर मागे हटणार नाही. भाजप[पासून मुस्लीम समाज दूर आहे या केवळ सांगायच्या गोष्टी आहेत. आपल्या समाजाचे समुदायाचे म्हणणे मांडायचे असेल तर कुणीतरी पुढे यावे लागेलच. भाजपसाठी प्रचार करण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे.

जावेद म्हणाले त्यांच्या घराण्याचा राजकीय क्षेत्राशी संबंध खूप जुना आहे. त्यांचे आजोबा लॉर्ड माउंटबॅटन व भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाभिक होते आणि ते राष्ट्रपती भवनात वाढले आहेत.

Leave a Comment