आफ्रिकेच्या मलावी मध्ये बनली जगातील पहिली मलेरिया लस


अतिशय धोकादायक आजार म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया रोगाची घोषणा केली असून या मलेरियाला प्रतिबंध करणारी जगातील पहिली लस बनविण्यात आफ्रिकेतील मलावी सरकारला यश मिळाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या ऐतिशासिक पायलट प्रोजेक्टचे स्वागत केले असून मलेरियाची ही लास जगातील पहिली आणि एकमेव असल्याचे जाहीर केले आहे.

दरवर्षी जगात मलेरियामुळे ४,३५,००० हून अधिक बालके मृत्युमुखी पडतात. मलावी सरकारने मलेरिया प्रतिबंधासाठी तयार केलेल्या या लसीचे नामकरण आरटीएस, एस असे केले असून दोन वर्षाखालील बालकांना ती दिली जाणार आहे. आगामी आठवड्यात आफ्रिकेतील घाना आणि केन्या येथेही अशीच लस सादर केली जाणार आहे. आकडेवारीनुसार मलेरियामुळे दर दोन मिनिटांनी एक बालक मृत्यू पावते आहे आणि त्यातील सर्वाधिक मृत्यू आफ्रिकेत होत आहेत.

भारतातही ८९ टक्के मलेरियाच्या केसेस आढळत आहेत आणि २०१६ मध्ये भारतात १.०९०,७२४ मलेरियाच्या केसेस नोंदल्या गेल्या आणि त्यातील ३३४ रुग्ण मृत्युमुखी पडले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे दक्षिण पूर्व आशियात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आढळले आहेत. मलेरियाने मृत्यू होणाऱ्या रुग्णात ५ वर्षाखालील मुलांचे प्रमाण अधिक आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रो घेब्रेरीवन यांनी सांगितले. ते म्हणाले गेली १५ वर्षे मलेरिया नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या मात्र त्या प्रभावी ठरू शकल्या नाहीत. आफ्रिकेत आता जी लस तयार झाली आहे ती ३० वर्षाच्या संशोधनातून तयार करण्यात आली आहे.

Leave a Comment