‘कुली नंबर १’च्या सिक्वलमध्ये झळकणार वरूण-साराची जोडी

varun-dhawan
१९९५ मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कुली नंबर १’ चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा डेविड धवन यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर डेविड धवन आता याच चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

वरूण धवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर त्याच्या अपोझिट सारा अली खानची वर्णी लागली आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या ऑगस्ट महिन्यात सुरूवात होणार आहे.

डेविड धवन यांच्या ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘जुड़वा 2 ‘ सारख्या चित्रपटात वरूण याआधीही झळकला होता. हे दोन्ही चित्रपट हिट ठरल्यामुळे आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान सारा आणि वरूणची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Leave a Comment