रोहित शेखराच्या हत्येप्रकरणी पत्नी अपूर्वाला अटक

rohit-shekhar
नवी दिल्ली – शवविच्छेदनाच्या अहवालानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन.डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखरची हत्या झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रोहितची पत्नी अपूर्वाला पोलिसांनी या हत्येप्रकरणी अटक केली आहे. गेले काही दिवस अनेक तर्क-वितर्क या हत्येप्रकरणी लावले जात होते.

रोहितची आई उज्जवला यांनी काही दिवसांपूर्वी अपूर्वावर आरोप केले होते. विवाहापूर्वी अपूर्वा हिचे अनैतिक संबंध होते आणि ती रोहितला संपत्तीसाठी वारंवार त्रास देत होती. दोघांमध्ये यातून खटके उडत होते. त्यांचे संबंध दोघांतील सततच्या भांडणामुळे घटस्फोटापर्यंत ताणले होते. पैशासाठी अपूर्वा आणि तिचे कुटुंबीय भूकेले आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, असे त्या म्हणत होत्या.

Leave a Comment