राज ठाकरेंच्या मंचावर मोदींच्या जाहिरातीतील लाभार्थी

raj-thakre
मुंबई – कुठल्याही योजनेचे आम्ही लाभार्थी नसून गिरगावसंबंधी एका वृत्तपत्राला २०१२ मध्ये मुलाखत दिली होती. सर्व कुटुंबियांनी मिळून त्यावेळी एक फोटो काढला आणि तो फेसबुकवर अपलोड केला होता. तोच फोटो उचलून भाजपने जाहिरातीमध्ये टाकल्याचा आरोप चिले कुटुंबियांनी केला आहे.

चिले कुटुंबियांचा फोटो मोदी सरकारच्या योजनेचे लाभार्थी म्हणून वापरण्यात आला होता. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत या कुटुंबाचा आणि योजनेचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी हे कुटुंब मंचावर बोलावून मोदी सरकारच्या खोट्या जाहिरातीचा पर्दाफाश केला. या कुटुंबाने यावेळी सरकारच्या कुठल्याही योजनचे आम्ही लाभार्थी नसून मोदी सरकार खोटारडे असल्याचा आरोप केला. तसेच या खोटारड्या सरकारचा निकाल जनतेनीच लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यापूर्वीही सोलापूरच्या सभेत राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या डिजीटल इंडियाचे वाभाडे काढत ‘हरिसाल’ या डिजीटल गावाची पोलखोल केली होती. तसेच या जाहिरातीमधील मॉडेल मंचावर उभा करून, तो सध्या रोजगाराच्या शोधात फिरत असल्याचे सांगितले होते.

Leave a Comment