कतरिना साकारणार धावपटू पी.टी. उषा यांची व्यक्तिरेखा ?

katrina
‘बूम’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटातील सध्याची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाई करु शकला नव्हता. पण चित्रपटातील कतरिनाच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र झाली होती. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स तिच्या अभिनय कौशल्यामुळे मिळत गेल्या. आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये झळकली कतरिना लवकरच एका बायोपिकमध्ये झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लवकरच सलमान खानच्या ‘भारत’मध्ये कतरिना झळकणार आहे. तिच्याकडे या चित्रपटानंतर ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट असून तिच्यासोबत या चित्रपटामध्ये अक्षय कुमार स्क्रीन शेअर करणार आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त ती लवकर अर्जुन पुरस्कार विजेती भारताची सुवर्ण कन्या पी.टी.उषा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. कतरिनाला या बायोपिकसाठी विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याची चर्चा २०१७ पासून होती.पण हा बायोपिकचा प्रश्न काही कारणास्तव मार्गी लागत नव्हता. आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दिग्दर्शक रेवती एस.वर्मा यांनी या बायोपिकसाठी कंबर कसली आहे.

दरम्यान, या बायोपिकसाठी कतरिनाला रेवती यांनी पहिली पसंती दिली आहे. कतरिनासोबत रेवतीने अनेकदा चर्चा केली. रेवतीने दोन दिवसांपूर्वीच कतरिनाची भेट घेत कथेवर चर्चा केली. पण अद्याप तरी कतरिनाने या चित्रपटासाठी होकार कळविला नाही. पी.टी. उषा यांच्यावर आधारित हा बायोपिक इंग्लिश, हिंदीसह चीनी, रशियन शिवाय अन्य भारतीय भाषांत प्रदर्शित करण्याची योजना आहे.

Leave a Comment