धारावीत युतीच्या उमेदवाराचा गल्ली बॉईजकडून प्रचार - Majha Paper

धारावीत युतीच्या उमेदवाराचा गल्ली बॉईजकडून प्रचार

rahul-shewale
मुंबई – काही दिवसांपूर्वी आलेल्या गल्ली बॉय चित्रपटाच्या माध्यमातून पाश्चात्य राष्ट्रातील रॅप संस्कृतीचे दर्शन घडले. त्यामुळे रॅप सर्वांनाच आवडू लागले. त्यातच दिवसेंदिवस रॅप ही संस्कृती वाढत गेल्यामुळेच आता आपल्या गाण्यातुन काही रॅपर प्रचार करताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात आहेत. अशातच सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक पक्षांच्या प्रचार सभा, भाषणांचे अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांपर्यंतही पोहचवले जात आहेत. पण त्यात सध्या सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे तो धारावीमधील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचावर दोन तरुणांनी प्रचारासाठी रॅप साँग बनवले आहे.

शिवसेना-भाजप उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांच्यावर या धारावीत राहणाऱ्या जाफर व यमराज या दोन नवख्या रॅपरसने गाणे बनवले आहे आणि दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे हे चांगले उमेदवार आहेत. तसेच त्यांनी आपल्या पाच वर्षात काय काय काम केली, ते या रॅप साँग द्वारे लोकांना पटवून देण्याचे काम ते करत आहेत व राहुल शेवाळे यांनाच मत देण्याचे आवाहन करत आहेत. पण ते हे आवाहन करताना पक्षाचे निवडणूक चिन्ह वैगरे काही घेत नाही आपल्या रॅप संस्कृतीत असणारे कपडे स्टाईल कॅच करत गाण्यात एकापाठोपाठ एकदा अनेकवेळा राहुल शेवाळे असा उच्चार करताना दिसत आहे.

या त्यांचा प्रचाराचा व्हिडीओ गाणे सोशल नेटवर्किंगवर व्हायरल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे दोन तरुण धारावी मध्ये राहतात. राहुल शेवाळे यांनी धारावीत काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमात या तरुणांना आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली होती. त्यांनी तेव्हा राहुल शेवाळे यांच्यावर एक गीत सादर केल्यामुळेच राहुल शेवाळे यांनी आपल्या प्रचारासाठी यंदा त्यांनी लिहिलेले गाणं सादर करायला सांगितले आहे. प्रामाणिकपणे आम्ही त्यांनी केलेल्या कामावर व विकासावर व भविष्यातील दूर दृष्टीकोण दिसत असल्यामुळेच आम्ही आमचा रॅप संस्कृतीद्वारे लोकांना राहुल शेवाळे यांना मत द्या व त्यांनी केलेल्या कामाविषयी गाण्यातून जनजागृती करत आहोत.लोकांचा ही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जाफर आणि यमराज यांनी सांगितले.

Leave a Comment