सनी देओलची संपत्ती ३५६ कोटी, हेमाशी असे आहे नाते

deol
बॉलीवूड कलाकार धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या पाठोपाठ देओल कुटुंबातील ६२ वंशीय धर्मेंद्र पुत्र सनी देओल यांनी भाजपचे सदस्यत्व घेऊन गुरुदासपूर मधून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. सनी देओल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामावर खुश असल्याचे अगोदरच सांगितले आहे. गेली अनेक वर्षे ते भाजपसाठी प्रचार करत होते. भाजपतर्फे गुरुदासपूर मधून बॉलीवूड अभिनेते विनोद खन्ना यांनी चारवेळा विजय मिळविला आहे आणि आता सनी देओल यांच्यावर ही जबाबदारी आली आहे. सनी देओल यांची एकूण मालमत्ता ३५६ कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई जुहू येथे अलिशान बंगला, पंजाब मध्ये पितृक घर, जमीन शिवाय युके मध्ये एक खास हवेली सनी यांच्या मालकीचे असून येथे ते अनेकदा चित्रपटाचे शुटींग करतात.

sunny
सनी एका चित्रपटासाठी ६ ते ७ कोटी रुपये चार्ज करतात त्याचबरोबर त्याचे स्वतःचे विजेता फिल्म नावाचे प्रोडक्शन हाउस आहे. शिवाय जाहिरातीतून ते पैसे मिळवितात. सनी यांच्या ताफ्यात पोर्शे, ऑडी सारख्या अनेक लग्झरी कार्स असून पर्सनली ते फॅमिली मॅन म्हणजे कुटुंबात रमणारे म्हणून ओळखले जातात. भाऊ बॉबी आणि आई प्रकाश कौर यांच्याबरोबर त्यांचे नाते खूपच घट्ट आहे. मात्र धर्मेंद्र याच्या दुसऱ्या पत्नी आणि भाजप खासदार हेमामालिनी याच्याबरोबर त्यांचे नाते फारसे जवळचे नाही अशी चर्चा सोशल मिडीयावर होत असते.

हेमामालिनी यांनी त्यांच्या बियॉंड द ड्रीम गर्ल या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी बोलताना मात्र आम्हाला गरज वाटते तेव्हा सनी नेहमीच आमच्याजवळ असतो असे सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या जेव्हा त्यांना २०१५ मध्ये कार अपघात झाला तेव्हा सर्वप्रथम सनी त्यांना भेटायला आला होता. सर्व कुटुंबाची सनी काळजी घेतो असे त्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात सनी खूपच बुजरा आहे आणि त्यामुळे मिडियासमोर येताना तो खुलून बोलत नाही असे सांगितले जाते.

धर्मेंद्र यांनी २००४ ते २००९ या काळात भाजपतर्फे बिकानेरचे खासदार म्हणून काम केले असून हेमामालिनी मथुरेच्या खासदार आहेत आणि पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत.

Leave a Comment