सॉफ्टबँक व्हिजन फंड अंबानींच्या जिओमध्ये भागीदारीसाठी उत्सुक

softbank
जपानी कंपनी सॉफ्टबँक व्हिजन फंड मुकेश अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ इन्फोकॉम मध्ये हिस्सेदारी खरेदीसाठी प्रयत्न करत असून जिओ मध्ये २०० ते ३०० कोटी डॉलर्स म्हणजे १३९४० ते २०९१० कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रयत्नात असल्याचे संकेत दिले गेले आहेत. अर्थात सॉफ्टबँक व्हिजन फंड आणि रिलायंस जिओ या कंपन्यांनी या बाबत अधिकृत माहिती अद्यापी दिलेली नसली तरी सॉफ्टबँक व्हिजन फंड जागतिक स्तरावर वेगाने वाढत असलेल्या कंपन्यातून गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे अशी बातमी मंगळवारी लिक झाली आहे आणि ही बातमी येताच रिलायंसच्या शेअरच्या किमतीत १ टक्का वाढ दिसून आली आहे.

सॉफ्टबँक व्हिजन फंडचे प्रमुख राजीव मिश्रा यांनी नुकतेच एका परिषदेत बोलताना कंपनी टेक्नॉलॉजी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म संबंधित व्यवसायात गुंतवून करणार असल्याचे व त्यासाठी १० हजार कोटी डॉलर्स जमविले गेले असल्याचे म्हणाले होते. अर्थात तज्ञांच्या मते रिलायंस जिओ यासाठी योग्य विकल्प आहे. याचबरोबर रिलायंस इंडस्ट्रीजच्या सीएफओनी कंपनीने डेबिट कमी करण्यासाठी जिओ फायबर व टॉवर अॅसेटचे इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट स्ट्रक्चरमध्ये बदलण्याची सुरवात केली असल्याचे गेल्या तिमाहीत जाहीर केले होते.

Leave a Comment