येथे पिंपळाच्या झाडातून प्रकटले हनुमान

bandhwa
देशात नुकतीच हनुमान जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली गेली. कलीयुगाचा देव म्हणून भाविकांच्या मनात बजरंगबली यांना स्थान आहे आणि त्यांच्या उपासनेने कलियुगातील पापांचा नाश होतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात अशी हनुमान भक्तांची भावना आहे. भारतात अनेक हनुमान मंदिरे आहेत मात्र त्यातील काही भाविकांसाठी खास श्रद्धास्थळे आहेत. असेच एक मंदिर मिर्झापूर जवळ असून विंध्याचल पर्वत रांगांजवळ आहे. त्याला बंधवा हनुमान म्हणून ओळखले जाते.

विंध्याचलमध्ये त्रिकोणी यात्रेचे खूप महत्व असून या यात्रामार्गावर हे देऊळ आहे. असे सांगतात कि येथील पिंपळाच्या झाडातून हनुमानाची मूर्ती प्रकट झाली होती आणि आजही ती रोज थोडी वाढते. ही मूर्ती नक्की कधी प्रकटली याची माहिती मिळत नाही मात्र हे स्थान प्राचीन असल्याचे सांगितले जाते. येथे हनुमान बालरूपात प्रकटले होते. या मुर्तीच्या नुसत्या दर्शनाने त्रिकोणी यात्रेचे पुण्य मिळते असे मानले जाते. ज्यांना शनी पिडा आहे अथवा साडेसाती आहे त्यांनी या बजरंगबलीचे दर्शन घेतले की शनी प्रकोप आणि साडेसातीचा त्रास होत नाही असाही विश्वास भाविकांत आहे.

या हनुमानाला लाडू, तुळस आणि फुल वाहिले जाते. जे या वस्तूंनी हनुमानाची पूजा करतात त्यांच्यावर बजरंगबली कृपा करतात असे सांगितले जाते.

Leave a Comment