महिंद्रा ग्रुपची हायपरकार पिपीनफेरीना बॅटिस्टा न्यूयॉर्क मध्ये सादर

batista
एखाद्या लढाऊ विमानाच्या वेगाशी स्पर्धा करू शकेल आणि वेगवान एफवन फेरारीलाही मात देऊ शकेल अशी हायपर कार पिपीनफेरीना बॅटिस्टा न्यूयॉर्कमध्ये न्यू इंटरनॅशनल ऑटो शो मध्ये सादर करण्यात आली आहे. भारतीय महिंद्रा ग्रुपच्या इटालियन सबसिडरी कंपनीने ही कार इटलीत तयार केली असून तिचे डिझाईनही इटलीत केले गेले आहे. २०१५ मध्ये महिंद्राने १६८ दशलक्ष युरो मध्ये ही कंपनी खरेदी केली आहे.

जगातील ही पहिलच लक्झरी इलेक्ट्रिक कार हायपर कार म्हणून डिझाईन केल्याचा दावा कंपनीने केला आहे. तिचा वेग ताशी २९० किमी असून सर्वाधिक वेग आहे ताशी ३५० किमी. ही कार ० ते १०० चा वेग फक्त २ सेकंदात घेते. ज्या गाड्यांचा वेग अधिक असतो त्या पर्यावरणाला अधिक नुकसान पोहोचवीत असतात मात्र या कारची खासियत अशी की, ती पूर्णपणे विजेवर चालत असल्याने सस्टेनेबल एनर्जीला प्रोत्साहन देईल शिवाय प्रदूषण करणार नाही. म्हणजे या कारमध्ये स्पीड कॉम्बिनेशनसह प्रदूषण मुक्त, इको फ्रेंडली सिस्टीम आहे.

या कारला १२० केडब्ल्यूएचची लिथियम आयन बॅटरी दिली गेली असून ती ऑल व्हील ड्राईव्ह कार आहे. तिच्या सर्व व्हीलसाठी वेगळ्या मोटर्स आहेत. या कारची फक्त १५० युनिट बनविली जाणार असून त्यातील ५० न्यूयॉर्क मध्ये तर बाकी आशिया आणि युरोप मध्ये विकली जाणार आहेत. २०२० पासून या कारची डिलिव्हरी सुरु होनर आहे. या कारची किंमत २.३ मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे १७ कोटी रुपये आहे. ही कार भारतात येणार का व कधी येणार याची माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment