जन्मावेळी नकळत विलग झाले, आता होणार जन्मोजन्मीचे साथीदार

shonna
जगात कोणता चमत्कार कश्या स्वरुपात घडेल हे कुणी सांगू शकत नाही. असे चमत्कार पहिले की नशीब, योगायोग असे काहीतरी असले पाहिजे यावर विश्वास ठेवावा लागतो. आपण आपल्या आयुष्यात अनेक व्यक्तींना भेटतो आणि त्यातील काही आपल्या खूपच जवळच्या असतात पण कधी कधी एकमेकांपासून विलग होण्याची वेळ येते आणि पुन्हा कधी भेटही होत नाही असा अनुभव अनेकांनी घेतला असले. असाच एका अद्भुत प्रकार इंग्लंड मध्ये घडला आहे. ग्रेटर मँचेस्टर मधील एका प्रसूतिगृहात २६ वर्षापूर्वी एकाच वेळी जन्माला आलेले शोनी ग्रीन आणि टॉम मॅक्वायर त्यावेळी एकमेकांना अनोळखी राहिले पण आता मात्र ते विवाहबंधनात बांधले जात आहेत.

couple
ही कथा अशी कि, २२ डिसेम्बर १९९२ रोजी शोना आणि टॉम यांचा एकाच प्रसूतीगृहात जन्म झाला होता पण त्यांच्या आईवडिलांची एकमेकांशी काहीच ओळख नव्हती आणि त्यांच्यात काही नातेही नव्हते. पण शोना आणि टॉम २०१० मध्ये एका पार्टीत भेटले. त्यांची ओळख एका मित्राने करून दिली पण तेव्हाही त्यांना त्या दोघांचा जन्म एकाच दिवशी एकाच ठिकाणी झाल्याची कल्पना नव्हतीच. टॉमने शोनाला सोशल मिडीयावर फ्रेंड रिक्वेस्ट टाकली होती पण शोनाने ती फार गंभीरपणे घेतली नव्हती.

असे झाले तरी ते दोघे एकमेकांना भेटत राहिले. टॉम शोनाच्या प्रेमात पडला पण शोनासाठी तो चांगला मित्र इतकेच होते. एक दिवस अचानक शोनाला टॉम आपल्याला आवडतो आणि आपण त्याचा प्रेमात पडलो आहे असा साक्षात्कार झाला आणि तिने तिची भावना टॉमला बोलून दाखविली. टॉमची कळी एकदम खुलली आणि त्याने शोनासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर बोलताना या दोघांना त्यांची ओळख जन्मापासून असल्याचे कळले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना झाला यात विशेष ते काय?

Leave a Comment