गल्ली बॉयच्या सीक्वलवर झोया अख्तर यांनी दिली ही प्रतिक्रिया

zoya-akhtar
प्रेक्षकांकडून रणवीर सिंह आणि आलिया भट्ट अभिनीत गल्ली बॉय चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांना याचा सीक्वल येईल अशी अपेक्षा आहे. याबद्दल गल्ली बॉयच्या दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी सुतोवाच केले आहे. त्या क्रिटीक्स चॉईस अवॉर्ड सोहळ्यात बोलत होत्या.

याबाबत झोया म्हणाल्या, चित्रपटाचे तुमच्यासारख्या क्रिटीक्सनी कौतुक केल्यानंतर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. तुमचा ज्याच्यावर भरोसा आहे अशा गोष्टी प्रमाणिकपणे, खरेपणाने केल्यानंतर जे काही घडते ते चांगलेच असते असे मला वाटते. अंतिम परिणामाकडे तुम्ही पाहिले पाहिजे. प्रक्रिया तुम्ही एन्जॉय केली पाहिजे.

झोया अख्तर यांना गल्ली बॉयचे सीक्वल निघणार का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली, ते कधी घडते पाहूया. ही एक चांगली सुरुवात असून सध्यातरी मेड इन हेवनच्या दुसऱ्या पर्वाची आम्ही तयारी करीत आहेत. त्याचसोबत आम्ही आणखी एका दुसऱ्या शोवरही काम करीत आहोत. दोन दिग्दर्शकांसोबत आम्ही दोन चित्रपटांवर देखील काम करीत आहोत. शिवाय रिमा कागती यांच्यासोबत मी एक चित्रपटही करीत आहे. २०१९ या वर्षाची सुरुवात झोया अख्तरसाठी विशेष ठरली आहे. गल्ली बॉय चित्रपट आणि मेड इन हेवन या वेब सिरीजला प्रचड य़श मिळाले आहे. पण गल्ली बॉयचा सीक्वल यावा ही अपेक्षा तमाम चाहते बाळगून आहेत.

Leave a Comment