आपल्या देशातील ‘या’ मंदिरात केली जाते चक्क बेडकाची पूजा

frog
आपल्या देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळी मंदिरे आहेत. त्यातच यापैकी काही मंदिरे खास आहेत. त्यामागे काही विशेष कारण असल्यामुळे ती मंदिरे खास आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आगळ्यावेगळ्या मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे चक्क बेडकाची पूजा केली जाते. चला तर मग जाणून घेऊया ते मंदिर नेमके आहे कुठे….
frog1
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर-खीरी जिल्ह्यातील ओयल परिसरात हे अनोखे मंदिर आहे. आपल्या देशातील असे एकमेव मंदिर आहे जिथे बेडकाची पूजा केली जाते. यामागे अशी आख्यायिका आहे की, ओयल शैव संप्रदायाचे हे ठिकाण प्रमुख केंद्र होते आणि भगवान शिवाचे येथील शासक भक्त होते. येथे मंडूक यंत्रावर आधारित एक प्राचीन शिव मंदिरही आहे.
frog2
११व्या शतकापासून ते १९व्या शतकापर्यंत हे क्षेत्र चाहमान शासकांच्या अधिपत्याखाली होते. या अनोख्या मंदिराचे निर्माण चाहमान वंशाचे राजा बख्श सिंहने केले. असे सांगितले जाते की, कपिला येथील एका महान तांत्रिकाने या मंदिराची वास्तु परिकल्पना केली होती. आपल्या विशेष शैलीमुळे तंत्रवादावर आधारित या मंदिराची संरचना लोकांना आपल्याकडे आकर्षित करते.
frog3
या मंदिराबाबत असेही सांगितले जाते की, साधारण २०० वर्ष जुने हे मंदिर आहे. त्याचबरोबर अशी देखील मान्यता आहे की, या मंदिराचे निर्माण दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी करण्यात आले होते. येथे दिवाळीसोबतच महाशिवरात्रीला देखील भाविकांची मोठी गर्दी असते.

Leave a Comment