नवी दिल्ली – 12 मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाराव्या मोसमाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या आयपीएलचा अंतिम सामन्याचा थरार हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर रंगणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
हैदराबादच्या ‘या’ मैदानावर रंगणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार
चेन्नईत आयपीएलच्या ‘प्ले-ऑफ’ फेरीतील Qualifier 1 सामना हा खेळला जाईल. तर विशाखापट्टणम येथे Qualifier 2 आणि Eliminator हे सामने खेळवले जाणार आहेत. 23 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि आणि रॉयल चॅलेजर्स बंगळरु यांच्या सामन्यापासून यंदाच्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली होती.