‘कबीर सिंह’मधील शाहिदचा खास लूक

shahid-kapoor
लवकरच ‘कबीर सिंह’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता शाहिद कपूर येणार आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य ‘अर्जून रेड्डी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. प्रेक्षकांची यातील शाहिदच्या लूकला चांगलीच पसंती मिळाली.


अशात चित्रपटाचे आणखी एक पोस्टर आता रिलीज करण्यात आले आहे. शाहिदचा नवा लूक पाहण्याची संधी ज्यात त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी यात शाहिदच्या अपोझिट झळकणार आहे. तर या चित्रपटाचेही दिग्दर्शन मुळ अर्जून रेड्डी चित्रपटाचे दिग्दर्शक संदिप रेड्डी वंगा करणार आहेत. चित्रपट येत्या २१ जूनला म्हणजेच दोन महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment