जग खूप अनोखे असून त्यात विविध तऱ्हेची माणसे राहतात हे आपल्याला आता इंटरनेटच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तिबद्दल सांगणार आहोत. जो मागील 47 पासून टायगर मास्क लावून आपल्या व्यवसाय करत आहे. जपानमध्ये राहणाऱ्या त्या व्यक्तिचे नाव योशिरो हरदा असे असून ही व्यक्ती पेपर विकण्याचे काम करते. पण वयाच्या 24 व्या वर्षी त्यांना एक आयडिया सुचली. त्यांनी एका दुकानातून चक्क 30 टायगर मास्क खरेदी केले. त्यागोष्टीला आता 47 वर्षे उलटली आहेत. तेव्हापासून ते आतापर्यंत योशिरो दररोज सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री हा मास्क लावतात.
आता योशिरो यांचे वय 71 वर्ष आहे. पण ते आजही मास्क लावतात. त्यांना ‘शिंजुकु टायगर’ म्हणूण जग हाक मारते. योशिरो याचे कुटुंब 1967 साली टोकियामध्ये आले आहे. यूनिव्हर्सिटी ड्रॉपआउट ते आहेत. ते शाळेच्या दिवसांपासूनच खर्चासाठी पैसे निघावे म्हणूण पेपर वाटायचे काम करायचे. त्यांनी यूनिव्हर्सिटीच्या दिवसात शिक्षणाऐवजी काम करण्याचा मार्ग निवडला आणि ते नापास झाले.
योशिरो 1972 मध्ये श्राइन फेस्टिव्हल बघण्यासाठी गेले होते. त्यांची नजर शिंजुकुच्या आयोजित या फेस्टिव्हलदरम्यान एका दुकानावर गेली जिथे टायगर मास्क ठेवले होते. हा मास्क फारच रंगीबेरंगी होता. त्यातले 30 मास्क त्यांनी खरेदी केले. हे मास्क त्यांनी आतापर्यंत सांभाळून ठेवले आहेत.
मजेदार बाब म्हणजे असे योशिरो यांनी का केले याची माहिती कुणालाच नाही. ते स्वत: सुद्धा याबाबत फार काही बोलत नाहीत. त्यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, माहीत नाही, मी सुद्धा काही विचार करुन केले नाही. हा एक अचानक आलेला विचार होता आणि काही नाही. ते सांगतात की, जेव्हा ते रस्त्याने जातात तेव्हा लोक त्यांना पाहून आनंदी होतात, हसतात आणि हे त्यांच्या आनंदाचे कारण आहे.
टोकियोच्या लोकांसाठी एखाद्या लिव्हिंग लिजंडसारखे ‘शिंजुकु टायगर’ म्हणजेच योशिरो हरदा आहेत. प्लास्टिक टायगर मास्कसोबत एका गुलाबी रंगाचा वीग लावतात. तसेच रंगीबेरंगी कपडेही परिधान करतात. तसेच शरीरावर वेगवेगळ्या खेळणी लटकवलेल्या असतात. त्याचे वजन 10 किलो असते. आता वय खूप झाले तरी योशिरो दररोज बाहेर पडतात. ते सांगतात हे माझ्या परिवारासारखे आहे. मला हे शरीरावरुन काढायचे नाही.
अनेकजण वयाच्या या टप्प्यावर नोकरीतून रिटायरमेंट घेतात. पण या वयात देखील योशिरो काम करतात. ते याला त्यांचे पॅशन मानतात. ते सांगतात की, आजही हे काम करताना मी अजिबात थकत नाही. मी मनाने जंगलाचा राजा आहे. त्यांच्या जीवनावर माहितीपटही तयार करण्यात आला आहे.