स्कॉटलंडच्या फलंदाजाचा टी-20 मध्ये भीमपराक्रम

scotland
स्कॉटलंड : टी-20 क्रिकेटमध्ये स्कॉटलंडच्या एका फलंदाजाने भीमपराक्रम केला असून स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सीने 17 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि पुढील 8 चेंडूत त्याने शतक झळकवले. ग्लोसेंस्टरशायर 2nd एकादश आणि बाथ सीसी या संघांमध्ये तेथे सुरु असलेल्या अनधिकृत ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत सामना खेळवण्यात आला होता. मुन्सीने त्यात 39 चेंडूत 147 धावांची वादळी खेळी केली.

जीपी विलोवसह ग्लोसेंस्टरशायर 2nd एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुन्सीने 53 चेंडूंत शतकी भागीदारी केली. 35 चेंडूंत विलोवने नाबाद 72 धावा केल्या. 23 चेंडूत तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या टॉम प्राइसनेही 50 धावा चोपल्या आणि ग्लोसेंस्टरशायर संघाने 20 षटकांत 3 बाद 326 धावा केल्या.

ख्रिस गेलच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावांचा विक्रम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी त्याने नाबाद 175 धावा केल्या होत्या आणि त्यावेळी संघाने 5 बाद 263 धावांपर्यंत मजल मारली होती. टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम धावांचा विक्रम मोडताना अफगाणिस्तान संघाने आयर्लंडविरुद्ध 3 बाद 278 धावा केल्या. त्यात हझरतुल्लाह झझाईसच्या नाबाद 162 धावांचा समावेश होता.

चौकार – षटकारांची स्कॉटलंडच्या फलंदाजाने आतषबाजी केली. 5 चौकार व 20 षटकार त्याने ठोकले. टी-20 क्रिकेटमध्ये जलद शतकाचा विक्रम गेलच्या नावावर आहे, परंतु मुन्सीने पाच चेंडू कमी खेळून शतक ठोकले आणि गेलला मागे टाकले. मुन्सीच्या संघाने हा सामना 112 धावांनी जिंकला.

Leave a Comment