राज ठाकरेंच्या सभांचे चांगले परिणाम दिसून येतील – अजित पवार

ajit-pawar
बारामती – काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमुळे फायदा होईल का, अशी चर्चा रंगली असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यावर भाष्य केले आहे. राज ठाकरेंच्या सभांचे चांगले परिणाम दिसून येतील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मोदींवर जनतेचा आता विश्वास न राहिल्यामुळे मोदींच्या सभेला गर्दी जमवावी लागते, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

मंगळवारी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदान केले. त्यांनी मतदानानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. भाजप-राष्ट्रवादीत यंदाच्या निवडणुकीत चांगलीच जुंपली होती. विखारी प्रचार सुरु असल्याचेही दिसून आले. अजित पवार याबाबत म्हणाले, आम्ही सुरुवात केली नाही. भाजपने सुरुवात केली होती. देशभरात शरद पवार फिरतात. पण शरद पवार कधी असे टोकाचे आरोप करत नाही. पण असे आरोप यंदा शरद पवारांना करावे लागले. त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य होते. आम्ही ५२ वर्षे चांगले काम केले. जी कामे अपूर्ण आहेत ती देखील आता आम्हीच पूर्ण करणार असे त्यांनी सांगितले.

फक्त निवडणुकीत भाजपची लोके येतात. गेल्या निवडणुकीत बारामतीतून महादेव जानकर यांना चांगली मते मिळाली होती. पण ते निवडणुकीनंतर एकदाही या भागात फिरले नाही. पण १२ महिने आम्ही जनतेसोबत असतो, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment