गायब होणार व्हॉट्सअॅपवरच असलेले जुने इमोजी

whatsapp
नवी दिल्ली – संवाद साधण्याचे व्हॉट्सअ‍ॅप हे प्रभावी माध्यम असून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. लवकरच नवे अपडेट्स घेऊन व्हॉट्सअ‍ॅप येत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, काही विशेष बदल व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये करणार आहे. डूडल फीचरमधील जुने इमोजी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल इमोजी येणार आहेत.

इमोजीच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटींगची गंमत आणखी वाढत असते. तसेच इमोजीच्या माध्यमातून मेसेज टाईप करण्यापेक्षा संवाद साधणे अनेकांना जास्त सोयीचे वाचत असते. व्हॉट्सअ‍ॅपच्या डूडलमध्ये सध्या अनेक कस्टमाइज स्टीकर्स आहेत, मीडिया फाइल पाठवताना जे एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात. व्हॉट्सअ‍ॅप मधील हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावे लागेल त्याचबरोबर ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत असे WABetaInfoने म्हटलं आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ने बीटा व्हर्जन 2.19.106 मधील जुने इमोजी काढून त्याठिकाणी नवे इमोजी टाकले आहेत.

त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपमधील स्टीकर हे फीचरसुद्धा अपडेट केले जात असल्याची माहिती मिळत आहे. WABetaInfo ने केलेल्या ट्विटनुसार व्हॉट्सअ‍ॅप लवकरच Animated Stickers लाँच करणार असल्याचे म्हटले आहे. iOS, अ‍ॅन्ड्रॉईड आणि वेब या तिन्ही प्लॅटफार्मवर हा बदल उपलब्ध राहणार असून त्याची सध्या चाचणी घेण्यात येत आहे.

Leave a Comment