महिलांची फसवणूक करुन ‘तो’ डॉक्टर झाला तब्बल 49 मुलांचा बाप !

ivf
आयुष्यमान खुराणाचा स्पर्म डोनेशनवर आधारित विकी डोनर हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटामुळे स्पर्म डोनेशन काय असते हे आपल्या पैकी बऱ्याच जणांना कळाले असेल. पण याच प्रकारच्या डोनेशन संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपत्यप्राप्ती न होणाऱ्या दाम्प्त्यांना मदत करण्यासाठी एका डॉक्टरने त्याच्या स्पर्मचा वापर केला. पण यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ती अशी की यासाठी त्याने त्याच्या क्लाइंट्सची परवानगीच घेतली नव्हती.
ivf1
फारच विचित्र कारनामा नेदरलॅंडमध्ये एका डॉक्टरने केला. हा खुलासा ज्या डॉक्टरबाबत झाला आहे तो आता जिवंत नाही. 2017 मध्ये डॉ. जन करबात क्लाइन नावाचा हा डॉक्टर मरण पावला. त्याच्याबाबत आता अशी माहिती समोर आली आहे की, आपल्या क्लिनिकमध्ये डोनेट करण्यात आलेले स्पर्म बदलून हा डॉक्टर त्याजागी त्याचे स्पर्म ठेवत होता. असे करुन तो आयव्हीएफच्या माध्यमातून 49 बाळांचा पिता झाला. तसेच ही सुद्धा चर्चा आहे की, 2009मध्येच या डॉक्टरचे क्लिनीक बेकायदेशीर कामांमुळे बंद करण्यात आले होते.
ivf2
नेदरलॅंडमध्ये रोटर्डमजवळील बिजडोर्प क्लाइनचे क्लिनिक शहरात होते. या संदर्भात टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार नुकत्याच करण्यात आलेल्या एका डीएनए टेस्टनंतर डॉक्टरच्या या कारनाम्याचा खुलासा झाला. कोर्टाने एका सामाजिक संस्थेच्या मागणीनंतर डीएनए टेस्टला परवानगी दिली होती. या क्लिनिकमध्ये जन्माला आलेल्या मुलांच्या आणि आई-वडिलांच्या सांगण्यावरून ही संस्था हे काम करत होती.
ivf3
याच वर्षी फेब्रुवारीमध्ये डॉक्टर क्लाइनशी संबंधित हा सगळा कारनामा समोर आला होता. डच कोर्टाने जेव्हा प्रकरणाची माहिती मिळताच डॉक्टरच्या आणि मुलांच्या डीएनएची टेस्ट करण्याची परवानगी दिली होती. कोर्टात डॉक्टर विरोधात पहिल्यांदा 2017 मध्ये तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार या क्लिनिकमध्ये जन्माला आलेल्या मुलांनी आणि त्यांच्या आई-वडिलांनी व डॉक्टरांच्या एका समूहाला डॉक्टरवर संशय आल्यावर करण्यात आली होती. संशय येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथे जन्माला आलेल्या सर्वात मुला-मुलींचे मिळते जुळते चेहरे आणि त्यांच्या सवयी. यातील एक मुलगा डॉक्टरसारखाच दिसत होता.
ivf4
रिपोर्टनुसार, डॉक्टर करबातने 2017 मध्ये मृत्यूपूर्वी एक जबाब नोंदवला होता. त्याच्यावर त्यामुळेही संशय आला होता. त्याने सांगितले होते की, 60 पेक्षा जास्त अपत्यांचा तो पिता झाला आहे. असेही म्हटले जात आहे की, डॉक्टरने स्वत: कबुली दिली होती की, त्याने अनेकदा डोनेट केलेल्या स्पर्मच्या जागी त्याचे स्पर्म ठेवले होते. करबातच्या स्पर्मच्या माध्यमातून जन्माला आलेल्या काही मुलांचे म्हणणे आहे की, त्यांना डॉक्टर त्यांचे पिता असल्याचा राग नाही, राग त्या डॉक्टरने त्यांच्या आईंची केलेल्या फसवणुकीबद्दल आहे.

Leave a Comment