अव्हेंजर एण्ड गेम रिलीजच्या पाच दिवसआधीच हाऊसफुल्ल झाला

end-game
येत्या शुक्रवारी हॉलिवूड चित्रपट अव्हेंजर एण्ड गेम रिलीज होणार आहे. पण रिलीजच्या पाच दिवस आधीच या चित्रपटाचे शो अनेक ठिकाणी हाऊसफूल झाले आहेत. या चित्रपटासाठी पीव्हीआर चित्रपटगृहाने अन्य चित्रपटांचे जवळपास सर्व वेळा हटवल्या. तरीही शुक्रवारची दिवसभरातील सर्व तिकीटे विकली गेली असून एकही तिकीट शिल्लक राहिलेले नाही.

या चित्रपटाच्या तिकीट विक्रीला रविवारी सुरुवात झाली. पण ही तिकीट सोमवारी सकाळी ११ वाजताच विक्री थांबवण्यात आली. या चित्रपटाचे तिकीट विक्री जवळपास प्रत्येक चित्रपटागृहात थांबवण्यात आले. याउलट या चित्रपटाचे तिकीट सोशल मीडियावर तिपटीने विकण्यात येत आहे.
भारतीय प्रेक्षकांमध्ये गेल्या वर्षी अव्हेंजर्स इनफिनीटी वॉर चित्रपटाची तुफान चर्चा होती. आता आगामी चित्रपटात सुपरहिरो जिंकतात का तसेच मेलेले सुपरहिरो परत येतात का हे पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये दिसत आहे. पण देशभरात आता पहिल्या काही दिवसांचे तिकीट जवळपास उपलब्ध नसल्यामुळे हा चित्रपट कसा पाहायचा हा प्रश्न चाहत्यांसमोर उभा राहिला आहे.

आपली समस्या सांगताना चित्रपटगृहांच्या मालकांनी म्हटले की, चित्रपटाची लांबी जास्त असल्यामुळे जास्त शो ठेवू शकत नाही. दुसरे चित्रपट हटवून त्या जागी या चित्रपटाला स्थान दिले जाऊ शकते पण हे दुसऱ्या चित्रपटांच्या निर्मात्यांसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन होईल.

सतत सोशल मीडियावर या चित्रपटाची तिकीटे ब्लॅकने विकण्याच्या चर्चा होताना दिसते. तसेच चित्रपटगृहात जास्त शो ठेवण्याची विनंती सातत्याने चाहत्यांकडून केली जात आहे. पण अनेक मालकांकडून याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. या चित्रपटासाठी अन्य चित्रपटांच्या वेळा बदलण्यावर पीव्हीआर चित्रपटगृह विचार करत आहे.

Leave a Comment