लाकडी कंगव्याचा वापर देईल केसांना नवसंजीवनी

wooden
आजकाल केस गळणे, तुटणे, रुक्ष होणे अश्या अनेक तक्रारी ऐकायला येतात. त्यावर उपचार म्हणून विविध प्रकारचे शाम्पू, तेले, कंडीशनर वापरण्याचा सल्ला दिला जातो मात्र तरीही खूप फायदा होतो असे दिसून येत नाही. त्यामुळे आपल्या या केस समस्येचे कारण आपण वापरत असलेला कंगवा तर नाही ना याची खात्री करून घ्यायला हवी. कारण केसांच्या या तक्रारींसाठी तुम्ही वापरात असलेले प्लास्टिक अथवा धातूचे कंगवे कारणीभूत असू शकतात. या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी लाकडापासून बनविले गेलेले कंगवे खूपच उपयुक्त ठरतात.

fani
भारतात फार पूर्वीपासून लाकडापासून बनविलेली फणी वापरण्याची प्रथा होती. आजही ग्रामीण भागात वृद्ध आजीबाई कडे अशी फणी सापडू शकेल. मात्र काळाच्या ओघात ही प्रथा बंद पडली. आता या फण्या कदाचित जुन्हा वस्तू संग्रहालयात पाहायला मिळतील. पण बाजारात अनेक कंपन्यांनी विविध झाडांच्या लाकडापासून बनविलेले कंगवे आणले आहेत. हे कंगवे तुमच्या केसांना नवसंजीवनी देणारे ठरू शकतात. याची अनेक कारणे आहेत.

haircomb
डोक्याची केसाखालाची त्वचा लाकडी कंगव्याच्या वापराने दाबली जाते. याचा फायदा डोक्यावरील अॅक्यूप्रेशर पॉइंटना होतो आणि त्वचेला मसाज मिळाल्याने तेथील रक्तप्रवाह सुधारतो. परिणामी केसाची मुळे घट्ट बनून केस गळती कमी होते. प्लास्टिक वा धातूचा कंगवा वापरून डोक्याच्या त्वचेत जे नैसर्गिक तेल असते ते समप्रमाणात पसरत नाही परिणामी केस तुटतात मात्र लाकडी कंगव्याने हे तेल एकसारखे डोक्यावर पसरले जाते त्यामुळे केस अधिक हेल्दी आणि चमकदार बनतात. अनेकांची डोक्याची त्वचा मुळातच तेलकट असते. लाकडी कंगवा हे तेल सर्वत्र पसरवितो आणि केस कमी तेलकट दिसतात.

लाकडी कंगव्याचे दात टोकदार नसतात तर थोडे बोथट असतात. त्यामुळे हा कंगवा केसातील गुंता सहज काढतो आणि केसात घर्षण कमी झाल्याने केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. केसाखालाची त्वचा सेन्सिटीव्ह असेल तर धातू अथवा प्लास्टिक कंगव्याने अॅलर्जी येऊ शकते तो धोका लाकडी कंगव्यामुळे राहत नाही कारण लाकूड हे नैसर्गिक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment