रिअलमी ३ प्रो भारतात लाँच

realme
चीनी ओप्पोचा सब ब्रांड रिअलमी ने त्यांच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन रिअलमी ३ प्रो चे भारतात लाँचिंग केले असून तो २९ एप्रिल पासून अमेझोनवर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. भारतीय बाजारात या फोनच्या ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज साठी १३९९९ तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज साठी १६९९९ रुपये किंमत ठेवली गेली आहे. गेल्याच महिन्यात कंपनीने रिअलमी ३ भारतात लाँच केला आहे. त्याच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हर्जनची किंमत ८९९९ रुपये आहे. नव्या फोनसोबत कंपनीने रिअलमी सी २ हा फोनही लाँच केला आहे. सी २ च्या २ जीबी रॅम, १६ जीबी मेमरी आणि ३ जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी च्या किमती अनुक्रमे ५९९९ व ७९९९ अश्या आहेत. या फोनची पहिली विक्री १५ मे पासून सुरु होणार आहे.

रियलमी ३ प्रो साठी ६.३ इंची फुल एचडी स्क्रीन दिला गेला असून ४०४५ एमएएचची फास्ट चार्जीग सपोर्ट बॅटरी दिली गेली आहे. ही बॅटरी १० मिनिटांच्या चार्जिंगवर ५ तासाचा टॉक टाईम देते असा कंपनीचा दावा आहे. फोनला २५ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला असून रिअलला १६ एमपीचा प्रायमरी आणि ५ एमपीचा सेकंडरी असा ड्युअल कॅमेरा सेट आहे. त्यात अल्ट्रा एचडी मोड ऑप्शन आहे त्यामुळे ६४ एमपीचे फोटो कॅप्चर करता येणार आहेत. फोनला मायक्रो युएसबी पोर्ट असून त्यामुळे स्टोरेज २५६ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. फोनसाठी खास सुपरस्लो फोटोग्राफी मोड आणि स्पीड मोड दिला गेला असून अँड्राईड ९.० पाय ओएस आहे. ब्लू, पर्पल आणि ग्रे कलर मध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

Leave a Comment